सुलभ कर्ज योजना
एकेकाळी कर्ज घेणे हे वाईट मानले जायचे, तशी मानसिकता आता राहिलेली आही. किंबहुना काही वेळा कर्ज काढणे हे गरजेचे होते. अशा वेळी प्रत्येकाने गरज आणि परतफेड ह्याबरोबरीने व्याज-दर आणि इतर अटींची जरूर तुलना करावी. म्हणजे पुढे मनस्ताप होणार नाही. देणारे देत आहेत [बँका] म्हणून घेणाऱ्याने [कर्जदार] घेत रहावे असे थोडेच आहे. व्यवसाय म्हणून बँका कर्जे ऑफर करणारच ! तुम्ही आम्ही निश्चित विचार करून पर्सनल लोन काढा. मात्र कर्जाऊ पैसा हे केवळ देणेच असते ही खुणगाठ आपण कर्जदारांनी मनाशी बांधली तर ‘ठेव-कर्ज’ हे ‘व्यवसाय-चक्र’ अव्याहतपणे चालू राहू शकेल.
१] ठेव पावती तारण – तुमची आमच्याकडे जर का ‘ठेव’ सुरु असेल तर त्याच्यावरती तुम्हाला कर्ज मिळू शकते. त्याकरिता कोणतीही प्रक्रिया किंवा कागदी सोपस्कारांचे अवडंबर अजिबात नाही. तुमची ठेव पावती आमच्याकडे घेऊन या आणि त्यावरील रक्कमेच्या ८०% टक्के इतके कर्ज तुम्हाला ‘ठेव पावती तारण’ योजने अंतर्गत अगदी सहजपणे मिळू शकते. त्यावर आकारले जाणारे व्याज हे ठेवीच्या २% टक्के इतके अधिक असते.
२] सोने तारण - सोने – दाग दागिने हे आपल्या घरातील जणू वैभवच. काहीवेळा अनपेक्षित अशी परिस्थिती उदभवते. अकाली आर्थिक समस्या उभी ठाकते. काय करावे? कोणाकडे पैसे उसने मागावे? अशी वेळ येते. पण असे काही विचार करू नका. तुमच्या घरातील ‘सोने’ हेच तुम्हाला तारणहार ठरू शकते. तुमच्याकडील एकूण सोन्याच्या मूल्यांच्या ८०% टक्के इतकी रक्कम कर्जाऊ म्हणून नक्कीच मिळू शकते. हे कर्ज परत-फेड करण्यासाठी तुम्हाला १२ महिन्यांचा कालावधी दिला जातो. ज्याद्वारे तुम्ही तुमच्या आर्थिक संकटातून बाहेर पडू शकता. कर्जाची परतफेड केल्यावर तुमचे सोने – तुमचे वैभव तुम्ही आनंदाने घरी नेवू शकता.
३] वाहन तारण कर्ज – तुमच्याकडील वाहन हीदेखील एक मौल्यवान मालमत्ताच असल्याने आम्ही त्यावर कर्ज देतो.
४] मालमत्ता तारण – तुमच्याकडे असलेली मालमत्ता म्हणजे एक प्रकारची संपती, त्यावरदेखील कर्ज मिळू शकते.
५] शेतकरी समृद्धी – आपला देश हा शेतीप्रधान आहे. बळीराजाचे महत्व जाणून शेतकरी बांधवांसाठी आम्ही ही विशेष कर्ज योजना कार्यान्वित केलेली आही
६] व्यापारी कर्ज- छोटे व्यापारी व विक्रेते ह्यांच्या आर्थिक गरज भागवण्यासाठी व त्यांच्या व्यवसायाला लागणारा कर्ज-पुरवठा करावा या हेतूने आम्ही व्यापारी कर्जे देतो. आमच्याकडे पिग्मी –दैनंदिन योजनेत सहभागी असणाऱ्या छोट्या व्यापारी – विक्रेत्यांना असे कर्ज मिळू शकते. जी व्यक्ती/व्यापारी पिग्मी योजनेत सातत्याने ३० दिवस पैसे ठेवत असतील त्यांना महागणपतीमार्फत आम्ही रु एक ते तीन लाख इतके कर्ज देतो व्याजदर हा २ % टक्के अधिक असतो. पण कोणतेही शुल्क आकारत नाही.
७] वैयक्तिक कर्ज- एखाद्याला अचानक पैश्याची गरज भासली तर त्वरीतपणे पैसा मिळावा व अडचणीवर मात करता यावी म्हणून आम्ही असे कर्ज अगदी तत्परतेने देतो.
महागणपती मल्टिस्टेट ही तुम्हाला तुमच्या कर्ज-गरजांसाठी योग्य असे कर्ज देण्यासाठी कटीबद्ध आहे. कारण तुमची अडचण ,तुमची समस्या ह्यावर तोडगा आणि उपाय काढणे हेच आमचे कार्य आहे. कोणाच्या मदतीला – गरजेला धावून जाणे, पाठीशी भक्कमपणे उभे राहणे ही आपली संस्कृतीच आहे. आणि आम्ही महागणपती मल्टिस्टेटमध्ये हे अगदी श्रद्धापूर्वक मानतो. तेव्हा कोणतीही अडचण आली किंवा आर्थिक चणचण जाणवली कि आमच्याकडे या आणि संकट-मुक्त व्हा.
आजच महागणपती मल्टिस्टेटच्या जवळच्या शाखेत जाऊन योजनेची माहिती घ्या.
अधिक माहितीसाठी टोल फ्री क्रमांकावर संपर्क करू शकता : 1800 210 2002