Mahaganpati Multistate
//

लखपती ठेव

लखपती ठेव

कोणताही व्यक्ती म्हंटल कि त्याचे लखपती किंवा करोडपती होण्याचे स्वप्न असते आणि ते तो किंवा ती अगदी मनापासून पहात असतात. पूर्वी काही मंडळी लॉटरीची तिकिटे घेत आणि आपल्या स्वप्नाची पहाट कधी उगवेल अशी वाट बघत असत. आता जमाना केबीसीचा आहे. प्रश्नांची उत्तरे दिली की करोडपती होण्याची तमन्ना प्रत्येकजण बाळगत असतात. पण खरे सांगायचे तर असे झटपट कमाईचे मार्ग शोधण्यापेक्षा ‘अपना हात जगन्नाथ’ या विचाराने स्व-कमाईतून बचत आणि गुंतवणुकीतून लखपती होण्याचा महामार्गच महागणपती मल्टिस्टेटकडे उपलब्ध असतांना फुटकळ गोष्टीत वेळ का दवडता

नेमकी ही स्कीम काय आहे ? तुम्ही आम्ही नेमके कधी लखपती होऊ? चला पाहूया. या योजनेचे एक वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही १२ महिने गुंतवा किंवा ७२ महिने, तरीही तुम्ही तुमची मुदत संपताक्षणी नक्कीच लखपती होऊ शकता. तेही कुठला नशिबावर अवलंबून न राहता आणि सर्वस्वी आपल्या कमाईवर.

योजना ठळकपणे –

  1. - तुम्हाला अवघ्या बारा महिन्यात लखपती व्हायचे असेल तरी कठीण नाही. तुम्हाला दर महिन्याला या योजनेत फक्त रु ८,०००/- गुंतवायचे कि तुमचे होतील रु ९६,०००/ आणि एका वर्षात व्हाल चक्क लखपती
  2. - अगदी आठ-दहा हजार गुंतवणे जमत नसेल तर रु ३६००/- इतका आकडा निश्चित करा आणि सलग २४ महिने नियमितपणे तितकीच रक्कम टाकत चला. बघा मुदती नंतर रु ९१,२००/- जमतील आणि मिळतील एक लाख
  3. - रु २४००/- गुंतवले तर ते किती महिने गुंतवावे लागतील? या प्रश्नांचे उत्तर असे कि रक्कम कमी झाली तर मुदतीचा कालावधी वाढतो. ३६ महिने पूर्ण झाल्यावर ८६,४०० जमा होतील, म्हणजे व्याज धरून तुम्ही व्हाल लखपती
  4. - रु १७००/- ही रक्कम सोयीची असील तर तुम्हाला लखपती होण्यासाठी थोडा अधिक काळ प्रतीक्षा करावी लागेल. म्हणजे किती? तर ४८ महिने पूर्ण झाले कि तुम्ही बनाल लखपती
  5. - पाच वर्षांत ही लखपती होण्याचे गणित या योजनेत आही बरे. दर महिना रु १२८०/- गुंतवत जा आणि पाच वर्षांत होतील रु. ७६,८००/- आणि व्याज मिळून येतील हाती रु १००,०००/-
  6. - ७२ महिने या कालावधीतही कोणीही लखपती होऊ शकतो, त्यासाठी दर महिन्याला अवघे रु १०००/- शिल्लक टाकायचे व या योजनेत गुंतवायचे कि मिळतील रु ७२,०००/- आणि एकूण रक्कम हाती पडेल ती बरोबर एक लाखच.

एका लाखाची गोष्ट इतक्या सहजतेने साध्य होऊ शकते, हेच ‘लखपती ठेव’ योजनेचे निराळेपण आहे. तुमची लाख मोलाची मेहनत आणि त्यातून शिल्लक राहिलेल्या रक्कमेतून लाखाचा निधी जमा होऊ शकतो, हे सत्य साकारू शकते ते केवळ महागणपती मल्टिस्टेटच्या नियोजनबद्ध योजनेतून आणि अथक परिश्रमातूनच. लाखाची बात आता स्वप्नवत राहिलेली नाही. हे वास्तव लक्षांत घ्या. एक हजाराची किमान रक्कमदेखील तुम्ही निवडू शकता आणि ७२ महिन्यांच्या कालावधीत उभारू शकता चक्क एक लाख रुपये. पण तुम्हाला रु ८०००/- इतके गुंतवता येत असतील तर ६ वर्षे का थांबा? अवघ्या एका वर्षांत पूर्ण होईल स्वप्न एक लाख उभे करण्याचे. सुरक्षितता आणि स्वच्छ प्रतिमा हेच तर आहे महागणपती मल्टिस्टेटचे आजवरचे वैशिष्ठ्य. एकदा एखादी योजना सुरु कराल, तर तुम्हाला कळू शकेल कि, गुंतवणूक बचतीचे अर्थार्जन काय असते ते?

आजच महागणपती मल्टिस्टेटच्या जवळच्या शाखेत जाऊन योजनेची माहिती घ्या.

अधिक माहितीसाठी टोल फ्री क्रमांकावर संपर्क करू शकता : 1800 210 2002