Mahaganpati Multistate
//

सुकन्या मंगल योजना

सुकन्या मंगल योजना

आपली कन्या ही आपल्यासाठी व आमच्यासाठीदेखील ‘सुकन्या’च आहे. म्हणून तर महागणपती मल्टिस्टेटने तयार केली कन्या-रत्नासाठी आकर्षक व लाभदायक योजना – सुकन्या मंगल योजना

ह्यातील कालावधीच इतका विचारपूर्वक तयार केला आहे कि ज्यात तुमच्या कन्येच्या वाढीचा - प्रगतीचा सर्वांगीण विचार दिसून येतो. पाच, दहा, पंधरा आणि एकवीस हे नुसते आकडे नाहीत, तर घराघरातील कन्येच्या – सुकन्येच्या वाढत्या वयाचे – प्रगतीचे महत्वाचे टप्पे आहेत.

वय – पाच – शाळेत जाण्याचे वय – हल्ली शैक्षणिक खर्च वाढलेला आहे

वय - दहा – हायस्कूल खर्च आणि इतर अनुषंगिक खर्चाची तरतूद

वय पंधरा – शालेय शिक्षण संपवून ज्युनिअर कॉलेजची पूर्व-तयारी

वय एकवीस – उच्च शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करण्याचे महत्वाचे वर्ष

या सुकन्या मंगल योजनेत कमीतकमी रुपये ५००/- पासून पुढे १०० च्या पटीत कितीही रक्कम गुंतवण्याची मुभा असल्याने आपली आर्थिक कमाईच्या प्रमाणात तुम्ही आपली या योजनेत गुंतवायची रक्कम निश्चित करू शकता.

दर महिना गुंतवा ५ वर्षांसाठी केल्यावर ५ वर्षांनी होतील आणि लाभ होईल

रु ५०० ३०,००० ३८,५००
रु १००० ६०,००० ७७,०००
रु २००० १२०,००० १५४,०००
रु ५००० ३००,००० ३८५,०००
रु १०,००० ६००,००० ७७०,०००

असेच लाभ आणि तुमची गुंतवणूक वाढ कशी होईल ह्याचा एक अंदाज खालीलप्रमाणे :-

१० वर्षांकरिता निश्चित रक्कम दर महिन्याला टाकल्यास रु ५००/- चे दहा वर्षांनी होतील – रु ६०,००० आणि तुम्हाला मिळू शकतील रु १०६,०००

तसेच रुपये ५०० इतकी रक्कम १५ वर्षांकरिता गुंतवल्यास १५ वर्षांनी होतील रु ९०,०००/- आणि मिळतील- २,३७,०००

तसेच आपण रु ५००/- इतकी रक्कम २१ वर्षांसाठी आमच्या योजनेत ठेवल्यास २१ वर्षांनी होतील १२६,००० आणि मिळतील ६००,०००

तुम्हाला सर्व वर्षांची गुंतवणूक रक्कम, किती रक्कम हाती येईल आणि एकूण लाभ पहायचा असेल तर आमच्या संकेत-स्थळाला भेट द्या.

कन्या ही धनाची पेटी मानली जाते तिच्यासाठी तुम्ही तिचे माता-पिता म्हणजेच जबाबदार पालक म्हणून प्रतिमाह काही रक्कम आमच्या सुकन्या मंगल योजनेत गुंतवत चला. मुदत संपल्यावर तुमच्या हाती जी घसघशीत रक्कम हाती येईल, ती थेट तुमच्या सुकन्येच्या हाती सोपवा आणि तिच्या डोळ्यात बघा – तिचे स्वप्नच दिसेल.

तुम्हाला तिच्या स्वप्नपूर्तीसाठी कोट्यवधी रुपये देण्याची इच्छा असेल तर तेही सहज शक्य आहे. तुम्हाला २१ वर्षाच्या योजनेत प्रतिमाह रु १०,००० गुंतवत रहायचे मुदत संपल्यावर मिळतील रु २,५२०,००० आणि एकूण रक्कम असेल चक्क रु १२०,००,०००/- ,अशक्य नाही ना ?

सतत 5 वर्षे नियमित हफ्ते भरल्यास हफ्ता क्र. 61 ते 65 संस्थेकडून भरले जातील.

आजच महागणपती मल्टिस्टेटच्या जवळच्या शाखेत जाऊन योजनेची माहिती घ्या.

अधिक माहितीसाठी टोल फ्री क्रमांकावर संपर्क करू शकता : 1800 210 2002