आपले अपत्य ही आपली जबाबदारी असते. त्याचे आरोग्य, शिक्षण या बाबी महत्वाच्या असतात. शिक्षण क्षेत्र हे अतिशय वेगाने विकसित होते आहे. एक करिअर म्हणून योग्य व उत्तम प्रकारचे शिक्षण घेणे हे मुलाच्या प्रगतीसाठी आणि भवितव्यासाठी जरुरीचे असते. शिक्षण – शालेय असो वा महाविद्यालयीन त्याकरिता लागणारा फी व तत्सम खर्च हा भारी असतो. पुढे एखादा व्यावसायिक अभ्यासक्रम करणे किंवा विदेशात शिकायला जाणे याकरिता अधिक पैश्याची आवश्यकता लागू शकेल. नियमित व पद्धतशीरपणे बचत केलीत तरच तुमचा मुलगा १८ वर्षांचा होईपर्यंत त्याला योग्य प्रकारे शिक्षण देऊन स्वत:च्या पायावर उभा राहण्यासाठीचा ‘निधी’ तुम्ही उभा करू शकता.
या तुमच्या गरजेचा विचार करून आम्ही आमची योजना तयार केलेली आहे ती आपल्या मुलाच्या / मुलीच्या भविष्याच्या तरतुदीसाठी. विशेषतः भविष्यकालीन शैक्षणिक खर्चासाठी उपयोगी पडेल अशीच आहे.
पालक म्हणून तुम्ही दर महिन्याला रु ५००/- पासून सर्वात अधिक म्हणजे रु १०,०००/- इतकी रक्कम निश्चित करू शकता. ही मुदत ५ वर्षे / १० वर्षे / १५ वर्षे / आणि २१ वर्षे या कालावधीसाठी आहे.
उदाहरण द्यायचे झाले तर – तुम्ही दरमहा रु ५००/- गुंतवलेत
तर पाच वर्षांनी मिळतील – रु ३०,०००/- आणि लाभ होईल रु ३८,५००/-
दहा वर्षांसाठी गुंतवलेत तर – रु ६०,०००/- आणि लाभ होईल रु १०६,०००/-
पंधरा वर्षांसाठी गुंतवलेत तर – रु ९०,०००/- आणि लाभ होईल रु २३७,५००/-
एकवीस वर्षांसाठी गुंतवलेत तर – रु १२६,०००/- आणि लाभ होईल रु ६००,०००
अशाप्रकारे तुम्ही आमच्याकडे रु १०००/- / रु २०००/- / रु ५०००/- / रु १०,०००/- गुंतवा आणि आपल्या अपत्याचे कल्याण करा
या योजनेची वैशिष्ठ्ये :-
० ते १८ वयाच्या मुलांसाठी ही योजना आहे
योजनेचा कालावधी पूर्ण झाल्यावर संपूर्ण रक्कम मिळेल.
मुलाचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यावर जमा रक्कमेच्या ५०% टक्के इतके कर्ज मिळू शकेल.
किमान रु ५००/- व त्यापुढे १०० च्या पटीत कितीही रक्कम दरमहा भरून आपण या योजनेत सहभागी होऊ शकता.
अद्वितीय वैशिष्ठ्ये – पाच हफ्ते संस्थेकडून
होय, तुम्ही पहिले ५ वर्षे सलग सर्व हफ्ते नियमित भरल्यास क्र. 61 ते ६५ हफ्ते हे संस्थेतर्फे भरले जातील.
आजच महागणपती मल्टिस्टेटच्या जवळच्या शाखेत जाऊन योजनेची माहिती घ्या.
अधिक माहितीसाठी टोल फ्री क्रमांकावर संपर्क करू शकता : 1800 210 2002