प्रेफरन्स शेअर्स [PREFRENCE SHARES]
आता आपल्याला शेअर्स - शेअरमार्केट हे शब्द काही परके राहिलेले नाहीत. भले आपण सरळ सरळ शेअर्समध्ये पैसे गुंतवायला घाबरत असलो तरीही ते काही आता रॉकेट सायन्ससारखे राहिलेले नाही. गेल्या अनेक वर्षांत त्यातील व्यवहार अनेक पटीत वाढलेले आहेत. आपल्याला काही शेअर्समधील गुंतवणुकीबाबत अधिक काही जाणून घ्यायचे नाही. तरही तुम्हाला प्रेफरन्स शेअर्स - प्राधान्य शेअर्सबाबत काही माहिती असणे अगत्याचे आहे. कारण हा एक शेअर्सचा प्रकार महागणपती मल्टिस्टेटच्या माध्यमातून अधिकाधिक लोकप्रिय होतांना दिसतो आहे.
शेअर्स म्हणजेच समभाग हे मुख्यत: दोन प्रकारचे असतात. एक म्हणजे साधे शेअर्स –जे नियमितपणे पब्लिक इश्युजद्वारे विक्रीला काढलेले असतात आणि दुसरे म्हणजे प्रेफरन्स शेअर्स. ह्यातील प्रेफरन्स हा शब्द अतिशय महत्वाचा आहे. तुम्हाला अन्य शेअरहोल्डरपेक्षा प्रेफरन्स म्हणजे प्राधान्य मिळू शकते. कंपनीला झालेल्या नफ्यातही या भागधारकांना अग्रक्रम मिळतो. कंपनीच्या आर्थिक दिवाळखोरीत साध्या शेअर्सपेक्षा प्राधान्य शेअर्स हे महत्वाचे असतात. कारण कंपनीच्या आर्थिक व्यवहारांत काही गडबड-घोटाळा झाल्यास बाकीचे शेअर्स बाजूला ठेवले जातात आणि प्रेफरन्स शेअर्स असलेल्यांना प्राधान्य दिले जाऊन त्यांना त्यांच्या शेअर्सची किंमत मिळू शकते.
महागणपती मल्टिस्टेटने नेमके कोणते साधन आणलेले आहे ? आपण असे प्राधान्य शेअर्स घेतले तर नेमका किती व कसा लाभ होणार? शेअर्सवर लाभांश मिळतो हे तर तुम्हाला ठावूक असेलच. आपल्यालाही लाभांश मिळू शकतो.शिवाय हे शेअर्स हे बऱ्यापैकी लिक्विड साधन म्हणून मानले जातात. कारण हे विकण्यासाठी असलेली प्रक्रिया तशी सुलभ असते. वेळखाऊ किंवा प्रोसिजरसाठी अधिक वेळ दवडला जात नाही. आपल्या आकस्मिक व तांतडीच्या गरजेसाठी अतिशय लवचिक असलेले प्राधान्य शेअर्स तात्काळ विकून आपल्याहाती त्याचे मूल्य मिळू शकते
शेअरबाजारात प्रत्यक्ष व्यवहार न करता, त्यातून गुंतवणुकीची अस्थिरता टाळून जर का आपणास स्थिर व नफादायी गुंतवणूक करायची असेल तर क्रेडीट सोसायटी – पतपेढीचे प्राधान्य शेअर्स हा एक पर्याय आपल्याला उपलब्ध होऊ शकतो. असे हे साधन बाजारात आणण्यात महागणपती मल्टिस्टेटने चांगलाच अग्रक्रम पटकावलेला आहे. आपल्या खातेदारांत असे हे अभिनव गुंतवणूक साधन हे कमालीचे लोकप्रिय होतांना दिसते आहे. पतपेढीचे असे शेअर्स घेऊन तुम्ही-आम्ही एका अर्थाने त्यापतपेढीला आर्थिकदृष्ट्या सबळच करत असतो. हाही एक सामाजिक – आर्थिक हेतू लक्षांत ठेवलात तर प्रेफरन्स शेअर्स घेण्याची तुम्हालाही उर्मी येईल. एका वेगळ्या प्रकारे आपण पैसे गुंतवतो आहोत व लाभांशसह अन्य लाभ घेण्यास आपण पात्र ठरतो आहोत. हेच तुम्हाला महागणपती मल्टिस्टेटमार्फत प्रेफरन्स शेअर्समध्ये पैसे गुंतवल्यावर कळू शकेल. मग वाट कसली पाहता? एक अभिनव साधन म्हणून आपल्या गुंतवणूक पोर्टफोलिओमध्ये महागणपतीचे प्रेफरन्स शेअर्स असायलाच हवेत, नाही का?
आजच महागणपती मल्टिस्टेटच्या जवळच्या शाखेत जाऊन योजनेची माहिती घ्या.
अधिक माहितीसाठी टोल फ्री क्रमांकावर संपर्क करू शकता : 1800 210 2002