पिग्मी दैनंदिन बचत योजना
छोटे व्यापारी, किरकोळ विक्रेते, हातगाडीवरून सामान–भाजीपाला विकणारे, छोटे दुकानदार ह्यांना वाली कोण? त्यांच्या आर्थिक गरजा कोण पाहणार? छोट्या व्यापारी-विक्रेते यांना मोठे होण्याचे साकारण्यासाठी कोण हातभार लावणार? या प्रश्नांना एकच उत्तर- महागणपती मल्टीस्टेट.. मोठ्या व्यापाऱ्यांकडे, बड्या उद्योजकांकडे लक्ष द्यायला अर्थबाजारपेठेत अनेक बँका-संस्था आहेत, पण या धडपडणाऱ्या घटकासाठी आधार देणारी आहे तुमची एकमेव संस्था - महागणपती मल्टिस्टेट
रोजच्या रोज कमाई करणाऱ्या या मंडळींना मार्गदर्शन करणे हे आम्ही आमचे परम कर्तव्य मानतो. म्हणूनच त्यांनी रोज आपल्या कमाईद्वारे होणारा थोडा वाटा आमच्या पिग्मी – दैनंदिन बचत योजनेत जरूर गुंतवत रहावे. आपल्या आवकमधून काही भाग शिल्लक टाकायची संवय लागली, तर उद्या तुम्हाला अडीअडचणीला तुमच्याच बचतीतील पैसे चटदिशी हाताशी येवू शकतील. कोणापुढे हात पसरायची वेळ येणार नाही. व्यापारी म्हणून स्वाभिमानाने जगू शकाल.
आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये वंचितांचा सहभाग मोठ्या प्रमाणात असल्याचे आढळून आले आहे. मग त्यांच्या गरजा, त्यांना काय हवे ? काय नको? हेही तत्परतेने पहायला हवे. त्यांना ‘चार पैसे’ बाजूला काढण्याची संवय लावावी व त्यातून आर्थिक शिस्तदेखील लागू शकते. ’आज मिळालेला पैसा –आजच उडवा-खर्च करा !’ हे धोरण धोक्याचे आहे. त्याची अप्रत्यक्ष जाणीव त्यांना करून दिली तर त्यांना चांगल्या प्रकारे त्यांचा व्यापार वाढवता येईल. तशीच वेळ आली तर महागणपती मल्टिस्टेटमार्फत त्यांना ‘व्यापारी कर्ज’ देणे व त्यांची बिझनेस-वृद्धी करणे हेही आम्ही कर्तव्य समजतो.
तुमच्या आजूबाजूला असणारे असे किरकोळ विक्रेते असतील, तुम्ही ज्यांच्याकडून तुमच्या दैनंदिन गरजेच्या वस्तू घेत असाल तर त्यांना जरूर आमच्याकडील योजनांची माहिती द्या. परस्परांना मदत करणे हाच खरा सहकार-धर्म आहे. आपण आर्थिक साक्षर असलो तर इतरांनादेखील साक्षरतेचा वसा देणे हे व्यक्तिगत कर्तव्य समजून त्यांना महागणपती मल्टिस्टेटबाबत माहिती द्या. तुमचे चार शब्द हे त्यांच्या भविष्यातील मोठ्या उद्योग-व्यापारासाठी पायाभूत ठरू शकतील.
थोडक्यात आमच्या पिग्मी दैनंदिन योजनेची झलक पहा –
१८० दिवसांसाठी – ५% व्याज
१८१ ते ३६५ दिवसांकरिता – ७% व्याज
३६६ दिवसांपेक्षा अधिक – ९% व्याज
छोट्यांना मोठे करणारी महागणपती क्रेडीट सोसायटीची ‘पिग्मी-दैनंदिन बचत योजना’
आजच महागणपती मल्टिस्टेटच्या जवळच्या शाखेत जाऊन योजनेची माहिती घ्या.
अधिक माहितीसाठी टोल फ्री क्रमांकावर संपर्क करू शकता : 1800 210 2002