Mahaganpati Multistate
//

सेविंग्ज खाते – बचतीची संवय लागण्यासाठी

एकेकाळी सेविंग्ज खाते हे लोकांमध्ये बचतीची संवय लागावी म्हणून अस्तित्वात आले होते, आत्ता जरी बचत वा गुंतवणुकीची अनेक साधने उपलब्ध असली तरी महाकाय लोकसंख्या असलेल्या देशात ज्यांची फक्त बँक खाती आहेत त्यांना सेविग्ज खाते हा एकमेव अधिकृत बचत पर्याय आहे. [आणि अजूनही खाते नसलेल्यांना हा ही पर्याय ठावूक नाही]. अनधिकृत व सावकारी पाशापासून दूर राहून, स्वकमाईतील काही हिस्सा संभाव्य खर्च किंवा भविष्यातील आकस्मिक खर्चासाठी बाजूला ठेवण्यासाठी बँक खाते. प्रोत्साहन म्हणून त्यावर व्याजरूपी उत्पन्न दिले जाते. बचत आणि करंट खात्यातील रक्कम ही खातेदार बँकेकडून कधीही परत मागू शकतो [म्हणून ‘डिमांड’ डिपोझीट असे म्हणतात] आणि ठेवी ह्या मुदतीवर ठेवलेल्या असतात.त्या ठराविक मुदतीला परत मिळतात. [म्हणून ‘टाईम’ डिपोझीट असे म्हणतात] मुदतीनुसार व्याजही सहसा वाढत जाणारे असे असते. एक वर्षापेक्षा अधिक किंवा दोन- पाच वर्षाच्या ठेवीवर अधिक व्याज मिळते. तुम्ही आम्ही जितक्या मुदतीसाठी पैसे गुंतवू तितका तो पैसा बँकेला तितक्या मुदतीसाठी वापरता येतो. म्हणून बँका त्यावर अधिक व्याज देतात. आपण ही आपल्या गरजा, खर्च आणि गुंतवणूक ह्याचा एकत्रित विचार करून काही पैसे बचत खात्यात, तर काही छोट्या किंवा दीर्घ मुदतीच्या ठेवींमध्ये गुंतवतो. [आता त्यांना जास्त उत्पन्न हवे आणि तशी अधिक जोखीम घेण्याची क्षमता असते, ते शेअर्स, म्युच्युअल फंड, सोने किंवा जमीन जुमलयात पैसे गुंतवतात]

परंतु महागणपती मल्टिस्टेटच्या सेविंग्ज खात्याची अशी वैशिष्ठ्ये आहेत कि, जी तुम्हाला इतरत्र कोठेही मिळणार नाहीत.

तुम्ही रुपये ५००/- भरून सेविंग्ज खाते उघडून तुम्ही आपल्याकडील शिल्लक रक्कम सुरक्षित ठेवू शकता, शिवाय त्यावर व्यक्तिगत विमा मिळवण्याचा अतिरिक्त फायदा घेवू शकता. सेविंग्ज खाती कुठेही उघडता येतात, पण महागणपती मल्टिस्टेटच्या सेविंग्जची तऱ्हाच न्यारी आणि लाभही लय भारी !

आजच महागणपती मल्टिस्टेटच्या जवळच्या शाखेत जाऊन योजनेची माहिती घ्या.

अधिक माहितीसाठी टोल फ्री क्रमांकावर संपर्क करू शकता : 1800 210 2002