लक्ष्मीचे महत्व हे आपल्या सुखासाठी, समाधानासाठी व समृद्धीसाठी महत्वाचे असते. म्हणून तर आपण दिवाळीला म्हणजे लक्ष्मी-पूजनाच्या दिवशी अगदी श्रद्धापूर्वक लक्ष्मीची आराधना करतो. पण निव्वळ आराधना व प्रार्थना करून लक्ष्मी प्रसन्न होत नाही. त्याकरिता आपल्याला माहिती घ्यावी लागते. बाजारात कुठे चांगले गुंतवणूक पर्याय आहेत का? ह्याचा शोध घ्यावा लागतो. गुगल गुरु आणि इतर गुंतवणूक गुरु असले तरी आपल्या सदसद्विवेकबुद्धीवर विश्वास ठेवून पुढे जायचे असते.
धनलक्ष्मी प्रसन्न व्हावी असे जर वाटत असेल तर आपले पैसे महागणपती मल्टिस्टेटच्या धनलक्ष्मी आवर्त योजनेत गुंतवा. पण त्याआधी या योजनेचे स्वरूप आणि आपल्याला होणारे नेमके लाभ काय आहेत हे जाणून घेऊया. प्रत्येकाच्या सोयीची अशी किमान व कमाल रक्कम ठरवण्यात आलेली आहे. म्हणजे किमान रु ५००/- ते सर्वात अधिक रु १०,०००/- इतकी रक्कम किमान एक वर्ष अधिक कितीही कालावधीच्या मुदतीसाठी तुम्ही ठेवू शकता. तुमच्या जीवनातील काही भविष्यकालीन गरजा व स्वप्नपूर्तीसाठी ही योजना म्हणजे कालबद्ध गुंतवणुकीचा एक आदर्श प्लान म्हणता येईल. तुम्हाला अगदी एक वा दोन वर्षांनी अमुक गोष्ट घ्यायची आहे किंवा पाच वर्षांनी जीवनातील महत्वाचा टप्पा गाठला जाणार आहे त्याची तरतूद या योजनेत गुंतवल्यास होऊ शकते. तब्बल दहा वर्षांनी तुम्हाला मोठी रक्कम उभी करायची आहे, तर चिंता नको.
‘थेंबे थेंबे तळे साचे’ या न्यायाने पुढे चला. पाचशेपासून ते हजारातील रक्कम तुम्ही तुमच्या उत्पन्न व आर्थिक कमाईचा अंदाज घेऊन निश्चित करू शकता आणि मुदती-पश्चात तुमच्या हाती तुम्हाला अपेक्षित अशी मोठी रक्कम उपलब्ध होऊ शकते. आपल्याच पैशाचे असे अर्थपूर्ण नियोजन करण्याची संधी तुम्हाला या योजनेद्वारे मिळू शकते. महागणपती मल्टिस्टेट मधील अर्थतज्ञ आणि अभ्यासकांनी अर्थव्यवस्था आणि भविष्यकालीन घटनांचा वेध घेऊन पद्धतशीरपणे “धनलक्ष्मी आवर्त’’ योजना तयार केलेली आहे. या योजनेचे आणखीन एक वैशिष्ठ्य म्हणजे तुम्ही एक वर्षासाठी पैसे गुंतवा किंवा थेट दहा वर्षांसाठी, व्याजाचा दर हा १२% टक्के असणार आहे. शिवाय तुम्हाला या तुमच्या ठेवीवर कर्ज मिळण्याची सुविधा उपलब्ध असेल.
तुम्ही गुंतवलेल्या रक्कमेच्या ८०% टक्के रक्कमेइतके कर्ज तुम्हाला मिळू शकते. शिवाय तुम्हाला जेव्हा गरज लागेल तेव्हा तुम्हाला जमा असलेली रक्कम काढण्याची सोयही असणार आहे. मात्र एक वर्षापेक्षा कमी कालावधीत काढल्यास दोन टक्के व्याजदर वजा केला जाईल. शिवाय जमा रक्कमेच्या ४% इतका सेवाशुल्क आकारला जाईल. अर्थात हे काही सर्वांच्या बाबतीत घडेलच असे नाही. परंतु प्रत्येकाच्या अडी-अडचणी आणि आकस्मिक संकटे उद्भवल्यास काही मार्ग आधीच तयार असावा व पुढे काही गैरसोय होऊ नये म्हणून या ग्राहक मानसिकतेचा विचार करणाऱ्या पतपेढीने कर्ज सोय तयार ठेवलेली आहे. एरवी ही योजना नक्कीच लाभदायक आहे.
आजच महागणपती मल्टिस्टेटच्या जवळच्या शाखेत जाऊन योजनेची माहिती घ्या.
अधिक माहितीसाठी टोल फ्री क्रमांकावर संपर्क करू शकता : 1800 210 2002