Mahaganpati Multistate
//

आधार मासिक व्याज योजना

निवृत्ती नंतर आधार कसला हवा? नियमित उत्पन्नाचा. म्हणूनच महागणपती मल्टिस्टेटने आखली एक निश्चित योजना – आधार मासिक व्याज योजना

ज्यांना पेन्शन – निवृत्ती वेतन मिळत नसेल किंवा मिळत असेलही पण त्यांना जर दर महिन्याला खर्चा पोटी, औषध-उपचार करण्यासाठी किंवा किरकोळ हौस मौज करण्यासाठी निश्चित पैसा हाती यावा असे जर का वाटत असेल तर आमच्याकडे या. आमच्या स्कीमची नवलाई जाणून घ्या, त्यातच तुमचे भले आहे. तुम्ही किमान रुपये ५०,०००/- इतके पैसे आमच्या या आधार मासिक व्याज योजनेत ठेवायचे. जास्त पैसे ठेवलेत तरी आम्ही तुमचे खूप खूप स्वागतच करू

तेही कसे तर किमान १२ महिन्यांसाठी.

आणि तुम्हाला महिन्याच्या एक तारखेला नियमितपणे मिळत राहतील रुपये - ११००/- ज्येष्ठ नागरिक, महिला, स्वातंत्र्य सैनिक, शेतकरी, दिव्यांग यांना रु ११५०/-.

ही योजना वय वर्षे १८ पूर्ण झालेल्या सर्वांसाठी उपलब्ध आहे. तरुण वयात असे नित्य-नियमाने बचत करण्याची व निश्चित उत्पन्न कमावण्याची संधी मिळाली तर चांगली संवय लागायला वेळ लागणार नाही

तुम्हाला महिन्याच्या महिन्याला मिळणारे व्याज हे एक प्रकारचे नियमित उत्पन्नच असणार आहे. जे हाती आल्यावर चिंता-व्याधी मुक्त झाल्याने तुम्ही टेन्शन-मुक्त जीवन जगू शकता. काय कशी वाटते आमची ही आधार देणारी मासिक व्याज योजना ?

आपणच केलेली गुंतवणूक आपल्याला कोणत्याही वयाला आर्थिक स्वयंपूर्ण बनवते, हेच तर महागणपती संस्थेचे समाजाप्रती, कुटुंबाच्याप्रती आणि व्यक्तीपोटीचे ध्येय आणि उद्दिष्ट आहे

तुमची अधुरी – अपुरी राहिलेली स्वप्ने म्हणजे हल्लीच्या आधुनिक भाषेत ‘बकेट लिस्ट’ म्हणतात, ती पूर्ण करण्यासाठी हे आधार देणारी मासिक व्याज योजना दिलासादायक आहे ना ?

आजच महागणपती मल्टिस्टेटच्या जवळच्या शाखेत जाऊन योजनेची माहिती घ्या.

अधिक माहितीसाठी टोल फ्री क्रमांकावर संपर्क करू शकता : 1800 210 2002