''महिला वर्गासाठी मंत्र नवा – ‘’दर महिना करा बचत, आपल्या सुरक्षित भविष्यासाठी!’’
पार्श्वभूमी - 'चूल-मूल' आणि माजघरातील चौकटीमध्ये व उंबरठ्याच्या आत अडकलेली स्त्री कधीच मोकळी झालेली आहे. आणि पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कुशलतेने उत्तुंग कामगिरी करते आहे. 'मुलगी शिकली प्रगती झाली' या वचनापासून आपल्या मुली आता खूप पुढे गेलेल्या आहेत, केवळ नोकरी नव्हे तर करिअर म्हणून उच्च-पद सांभाळणे व नवनवी क्षितिजे गाठणे त्यांनी सहजशक्य करून दाखवलेले आहे.
आजची मुलगी व महिला साक्षर - सुशिक्षित कमावत्या झालेल्या असल्या तरी प्रत्येकीला गुंतवणुकीचा, खर्चाचा अधिकार मिळतोच असे नाही. पैसे कुठे व कसे गुंतवायचे हे आजही घरातला पुरुषवर्गच ठरवतो. तो अधिकार कुटुंबातील स्त्रीला मिळायला हवा. तशी आधुनिक मानसिकता तयार झाली पाहिजे. त्याकरिता गुंतवणूक योजना व त्याबाबतची माहिती असण्याची आवश्यकता आहे.
भिन्न वयोगटातील / आर्थिक स्तरातील मुली आणि महिलांची आर्थिक गरज आणि उपाय - आपल्या देशातील मुली व महिलांचे ग्रामीण, निम-शहरी आणि शहरी विभागांत वर्गीकरण केले तर त्यांना कधी व काय प्रकारात आर्थिक बळ अपेक्षित आहे हे सर्वप्रथम पाहिले पाहिजे. तरच इच्छा आणि अपेक्षा - पूर्ती ह्यांची पक्की सांगड घातली जाईल. म्हणून आज आपण पाहणार आहोत विविध प्रकारच्या मुलींनी, महिलांनी आर्थिक बाबतीत काय केले पाहिजे वा काय करू नये. नेमके कुठे गेले तर आर्थिक मदत मिळू शकेल आणि आपले स्वप्न-ध्येय पूर्ण करण्यासाठी, स्वावलंबी होण्यासाठी पैशाची बचत कशी करायची? आपल्या स्वप्नांना – भविष्यकालीन योजनांना आर्थिक सहाय्य कसे मिळवायचे? माहिती घेऊया.
गुंतवणुकीचा मंत्र - समाजातील विविध स्तरातील मुली आणि स्त्रिया -त्यांच्या आर्थिक गरजा आणि बँकिंग माध्यमातून मिळणारा आर्थिक दिलासा काय असतो, ह्याचा थोडक्यात आढावा घेणार आहोत.
मुली - विद्यार्थीदशेतील - मग ती ग्रामीण भागातील असो किंवा मोठ्या महानगरातील. कुटुंबाची आर्थिक स्थिती बेतास बात असेल तर शिक्षण घेणे हे एक मोठे आव्हान असते. जरी फी माफ असली, शिष्यवृत्ती असली तरी दैनंदिन गरजा भागवणे जरुरीचे असते. पॉकेट-मनीचा प्रश्नच नसतो,पण जे काही पैसे मिळत असतात, त्यातून स्वतःचे बचत खाते उघडले तर स्वतःसाठी काही पैसे जमा होऊ लागतील,त्यावर व्याजरूपी उत्पन्न मिळू शकेल. काही मुली ट्युशन्स किंवा पार्ट टाइम काम करून स्वतः पैसे कमावीत असतात. असा पैसे शिल्लक राहिला तर प्रत्येकवेळी घरातील मदतीवर अवलंबून न राहता आपली सोय आपण करू शकतो. हे स्वावलंबन दीर्घकालीन फायद्याचे ठरू शकते.
कमावत्या पण अविवाहित तरुण मुली- आपले शिक्षण पूर्ण केल्यावर नोकरी करणाऱ्या मुलींनी बचत व गुंतवणूक दोन्हीकडे काही प्रमाणात तरी लक्ष दिले पाहिजे. स्वतःसाठी पैसे खर्च करणे काही चुकीचे नाही,पण पद्धतशीरपणे आपल्या व कुटुंबाच्या मोठ्या गरजांसाठी पैसे उभे करणे केव्हाही चांगलेच. उदाहरणार्थ - जागा घेणे , स्कुटरसारखे वाहन घेणे, आई-वडिलांच्या इच्छा पुरवणे किंवा स्वतःच्या लग्नासाठी पैसा जमा करणे. ह्याकरिता निववळ सेविंग खाते असून चालणार नाही. शिस्तबद्ध बचतीसाठी नियमित रक्कमेचे
विवाहित स्त्रिया - जीवनातील अनेक टप्पे पूर्ण करण्यासाठी आर्थिक पाठबळ लागते ,हे जाणून प्रत्येक वळणे म्हणजे मुलांचा जन्म, शिक्षण, लग्नकार्य ह्याकरिता कसे पैसे उभे करता येईल, त्यानुसार बँक -ठेवी, पीएफ, नित्य गुंतवणूक योजना अशा माध्यमांतून पैसे बाजूला काढा. ह्यांच्याकडे दूरदृष्टी व दीर्घकालीन पर्याय म्हणून जरूर पाहावे.
भविष्यकालीन तरतुदीसाठी महागणपती योजना – गृहलक्ष्मी सन्मान :
आपल्याला पगाररूपी नियमित उत्पन्न मिळत असेल किंवा स्वकमाईतून काही रक्कम बचत करण्यासाठी शिल्लक रहात असेल तर भविष्यात उपलब्ध व्हावी म्हणून ही योजना उत्तम आहे. कशी आहे? हे आपण जाणून घेणार आहोत. या योजनेत तुम्ही अगदी रु ५००/- पासून पुढे १०० रुपयांच्या पटीत कितीही रक्कम तुम्ही दर महिन्याला गुंतवू शकता. तुमची आवक पाहून तुम्ही दर महिन्याला किती पैसे गुंतवायचे हे तुम्ही व तुमच्या कुटुंबातील सदस्य ठरवू शकता. मात्र जी रक्कम निश्चित कराल,ती अखंडितपणे गुंतवायची जबाबदारी असणार आहे.या योजनेत चार प्रकारे तुम्ही तुमचे पैसे गुंतवू शकता. अगदी पाच वर्षे, दहा वर्षे, पंधरा वर्षे आणि एकवीस वर्षे या कालावधीत तुमच्या घरातील काही अपेक्षित खर्च- मुलांची शिक्षणे, लग्न, मनातील संकल्प – घर, गाडी ह्याकरिता स्वत:चे पैसे स्वत:च्या बचतीतून उभे करण्याची किमया महागणपती मल्टीस्टेटच्या गृहलक्ष्मी सन्मान योजनेद्वारे तुम्ही करू शकता.
महागणपती मल्टीस्टेटची गृहलक्ष्मी सन्मान योजना :
१] पाच वर्षांसाठी –
दर महिन्याला अमुक पैसे गुंतवले कि ते तुम्हाला व्याजासह पाच वर्षांनी परत मिळतील. ती रक्कमदेखील तुम्हाला आताच गुंतवताना कळू शकते. कारण आपला चार्ट तयारच आहे.
उदाहरणार्थ – रु ५०० प्रती महिना गुंतवलेत तर पाच वर्षे पूर्ण झाल्यावर तुम्ही गुंतवलेली रक्कम असेल रुपये ३०,०००/- आणि तुम्हाला मिळेल रुपये ३८,५००/ इतकी रक्कम.
समजा तुम्ही दर महिन्याला रु १०,००० इतकी रक्कम गुंतवू शकलात तर तुमची एकूण गुंतवणूक असेल रुपये ६,००,०००/- मात्र तुम्हाला व्याजासह हातात मिळू शकतील रु.७,७०,०००/-.
२] दहा वर्षांसाठी –
दर महिन्याला अमुक पैसे गुंतवले कि ते तुम्हाला व्याजासह दहा वर्षांनी परत मिळतील. ती रक्कमदेखील तुम्हाला आताच गुंतवताना कळू शकते, कारण आपला चार्ट तयारच आहे.
उदाहरणार्थ – रु ५०० प्रती महिना गुंतवलेत तर दहा वर्षे पूर्ण झाल्यावर तुम्ही गुंतवलेली रक्कम असेल रुपये ६०,०००/- आणि तुम्हाला मिळेल रुपये १,०६,०००/ इतकी रक्कम
समजा तुम्ही दर महिन्याला रु १०,००० इतकी रक्कम गुंतवू शकलात तर तुमची एकूण गुंतवणूक असेल रुपये १२,००,०००/-. मात्र तुम्हाला व्याजासह हातात मिळू शकतील रु.२१,२०,०००/-
३] पंधरा वर्षांसाठी –
दर महिन्याला अमुक पैसे गुंतवले कि ते तुम्हाला व्याजासह पंधरा वर्षांनी परत मिळतील. ती रक्कमदेखील तुम्हाला आताच गुंतवताना कळू शकते. कारण आपला चार्ट तयारच आहे.
उदाहरणार्थ – रु ५०० प्रती महिना गुंतवलेत तर पंधरा वर्षे पूर्ण झाल्यावर तुम्ही गुंतवलेली रक्कम असेल रुपये ९०,०००/- आणि तुम्हाला मिळेल रुपये २,३७,०००/ इतकी रक्कम
समजा तुम्ही दर महिन्याला रु १०,००० इतकी रक्कम गुंतवू शकलात तर तुमची एकूण गुंतवणूक असेल रुपये १८,००,०००/-. मात्र तुम्हाला व्याजासह हातात मिळू शकतील रु.४७,५०,०००/-
४] एकवीस वर्षांसाठी –
दर महिन्याला अमुक पैसे गुंतवले कि ते तुम्हाला व्याजासह एकवीस वर्षांनी परत मिळतील. ती रक्कमदेखील तुम्हाला आताच गुंतवताना कळू शकते.कारण आपला चार्ट तयारच आहे.
उदाहरणार्थ – रु ५०० प्रती महिना गुंतवलेत तर एकवीस वर्षे पूर्ण झाल्यावर तुम्ही गुंतवलेली रक्कम असेल रुपये १२६,०००/- आणि तुम्हाला मिळेल रुपये ६००,०००/ इतकी रक्कम.
समजा तुम्ही दर महिन्याला रु १०,००० इतकी रक्कम गुंतवू शकलात तर तुमची एकूण गुंतवणूक असेल रुपये २५,२०,०००/- मात्र तुम्हाला व्याजासह हातात मिळू शकतील रु.१,२०,००,०००/-
घरातल्या लक्ष्मीचा –गृहलक्ष्मीचा सन्मान करण्याची ही अनोखी संधी मिळत आहे, आपण जरूर आपले पैसे गुंतवा आणि भविष्य सुरक्षित करा.
आजच आमच्या जवळच्या शाखेत जाऊन योजनेची माहिती घ्या. अधिक माहितीसाठी टोल फ्री क्रमांकावर संपर्क करु शकता : 1800 210 2002